– स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत करू शकता नोंदणी
The गडविश्व
नागपूर, दि. १२ : भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने 7-14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, कला, हस्तकला आणि साहित्यावरील वार्षिक राष्ट्रव्यापी स्पर्धा ‘SPLASH’ सुरू करण्याची घोषणा केली. या वर्षी, स्प्लॅश ‘ग्रॅटिट्युड‘ या संकल्पनेवर आधारित आहे. स्पर्धेतील सहभागींना त्यांच्या सर्जनशीलतेद्वारे कौतुक तसेच कृतज्ञतेचे महत्त्व सांगण्यास, करण्यास आणि व्यक्त करण्यास प्रोत्साहित करेल. भाग घेऊ इच्छिणारे ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत www.axisbanksplash.in वर नोंदणी करू शकतात. याशिवाय निवडक बँक शाखा, शाळा, मॉल्स आणि निवासी कल्याण संघटना (RWAs) येथे ऑन-ग्राउंड स्पर्धा देखील ॲक्सिस बँक आयोजित करेल. या उपक्रमाद्वारे, भारतभरातील ७ लाखाहून अधिक सहभागींशी प्रत्यक्ष आणि डिजिटली (फिजिटली) कनेक्ट होण्याचे ॲक्सिस बँकेचे उद्दिष्ट आहे.
‘या’ दोन वयोगटांमध्ये विभागली गेली स्पर्धा
७-१० वर्षे आणि ११-१४ वर्षे
सहभागींना कृतज्ञतेअंतर्गत आणखी दोन विषय मिळतील. ‘द ग्रेटफुल हार्ट्स’ (७-१० वर्षे) आणि ‘द अनसंग हिरोज’ (११-१४ वर्षे). रेखाचित्र, हस्तकला आणि साहित्याद्वारे आपले विचार आणि सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित केले जाईल. सहभागींच्या कलाकृतींचे मूल्यमापन सन्माननीय ज्युरी पॅनेलद्वारे केले जाईल, ज्यात आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सहसचिव शरद तावडे; विशाल सेठिया, नॅशनल कॉन्टेन्ट डायरेक्टर फॉर इंडिया, रेडिओ मिर्ची; विक्रांत शितोळे, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चेअरमेन & सेक्रेटरी, आणि सॅव्हियो मस्करेन्हास, अमर चित्रकथेचे ग्रुप आर्ट डायरेक्टर यांचा समावेश आहे.
स्प्लॅशच्या १२ व्या आवृत्तीचे अनावरण करताना, ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनूप मनोहर म्हणाले, “ही तरुण मने अद्वितीय विचार, सर्जनशीलता आणि तेजस्वी कल्पनांनी भरलेली आहेत. आपण सर्वजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढील पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी प्रेरित करतात. SPLASH द्वारे, आम्ही त्यांना त्यांच्या आंतरिक सर्जनशीलतेला चॅनेलाइज करण्यासाठी, क्राफ्ट, ड्रॉइंग आणि साहित्याच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. यंदाच्या ‘कृतज्ञता’ या संकल्पनेद्वारे आम्ही आभारी असण्याचे मूल्य रुजवण्यावर तसेच अधिक कृतज्ञ समाजाला प्रेरणा देण्यावर भर देत आहोत. आमचा विश्वास आहे की, या तरुण मनांना व्यक्त होण्याची संधी देऊन, आमच्या सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करत आहोत. स्प्लॅशमधून समोर येणाऱ्या अप्रतिम कला पाहण्यासाठी आणि तरुण मनांच्या सर्जनशीलतेला आणि क्षमतेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’
स्पर्धेतील विजेत्यांना या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. प्रत्येक श्रेणीतील शीर्ष ३ अंतिम स्पर्धकांना प्रत्येकी २ लाख रु.ची आणि उपविजेत्याला प्रत्येकी १ लाखांहून अधिक बक्षिसे दिली जातील. याशिवाय, सर्व विजेत्यांना त्यांच्या कलाकृती म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी (MAP), बेंगळुरू येथे प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, तसेच अग्रगण्य संस्थांद्वारे विशेष क्युरेट केलेल्या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळेल. याव्यतिरिक्त, शीर्ष ४०० पात्रताधारकांना विवो, अमेरिकन टुरिस्टर, बीएसए, ट्रेंड्स, बोट, इक्सिगो, टिंकल, टॉईज “आर” अस, म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी, सेंटर फॉर साईट, इमॅजिन, ग्रिटझॉ, ऑडी इंडिया अँड ब्रदर यांसारख्या भागीदारांकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट मिळतील.
स्पर्धेसोबतच, बँक शाळेतील सहभागींसाठी आकर्षक सत्रे आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करेल. मुलांचे बहुचर्चित पात्र ‘छोटा भीम’ हे आर्थिक साक्षरतेचे मौल्यवान धडे देणार आहे आणि व्हॉबलची एक ऑडिओ मालिका आर्थिक संकल्पना आणि कृतज्ञतेचे महत्त्व आकर्षक आणि मजेदार कथांद्वारे शिकवेल.
या स्पर्धेच्या माध्यमातून बँकेने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत देशभरातून ६.८ लाखाहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यात दरवर्षी ३६ टक्क्यांनी वाढ होते आहे. शारीरिक आणि डिजिटल दोन्ही पद्धतीने स्पर्धा आयोजित करून बँक ५० दशलक्षपेक्षा जास्त लोकांपर्यंत एकत्रितरित्या पोहोचली आहे. या स्पर्धेत प्रत्येक मुलाला त्याची प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी मिळते आहे. e4m गोल्डन माईक्स येथे बँकेने प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार, एसीईएफ ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट समिटमध्ये एक पुरस्कार आणि मोहिमेसाठी पुरस्कार पटकावले.