चकमकीत तब्बल १२ नक्षल्यांना कंठस्नान

3380

– दोन जवानही जखमी, घटनस्थळावरून साहित्यही जप्त
The गडविश्व
बिजापूर, दि. ११ : जिल्ह्याच्या पीडिया जंगलात शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत तब्बल १२ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे. तर नक्षल्यांनी पेरलेल्या आयईडी बॉम्बचा स्फोट झाल्याने दोन डीआरजी जवान जखमी झाले आहेत.
गंगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगलात नक्षल्यांची सतत बैठक होत असल्याबाबत माहिती मिळाली तसेच या बैठकीत मोठे नक्षली नेते उपस्थित असल्याबाबतही खात्रीशीर माहिती मिळाल्याने माहितीच्या आधारे सुकमा, विजापूर आणि दंतेवाडा येथून डीआरजी, एसटीएफ, सीआरपीएफ आणि कोब्राची एक संयुक्त टीम शुक्रवारी सकाळी पीडियाच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोलीस नक्षल चकमक उडाली. ही चकमक सकाळी ६ वाजता पासून सायंकाळी ५ वाजतपर्यंत सुरू होती अशी माहिती असून या चकमकीत तब्बल १२ नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. दरम्यान नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडी बॉम्बचा स्फोट झाल्याने दोन डीआरजी जवान जखमी झाले असून उपचार सुरू आहे.
घटनस्थावरून १२ बोअरच्या बंदुका, देशी बनावटीची रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक वस्तू, औषधे, वैद्यकीय किट आणि गणवेश, पीट्टु आणि दैनंदिन उपयोगी वस्तू जप्त केल्या आहेत. चकमकीत १२ नक्षली ठार झाले असले तरी पुन्हा काही नक्षली जखमी व ठार झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नक्षली आणखी सक्रिय होत हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत दिसून येत असून पोलिसही त्याप्रमाणे सतर्क होत कारवाया करीत आहे.

(#thegdv #thegadvishva #bijapur #cgnews #cgpolice #drg #naxalencounter #firing)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here