स्वयं रक्तदाता जिल्हा समिती द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन ; २५ रक्तदात्यांचा पुढाकार

255

– रुग्णांची वाढती गरज ओळखून तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : जिल्हा रक्तपेढी, गडचिरोली येथे रक्तसाठयाचा तुटवडा पडल्याने रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी ०९ मे २०२४ रोजी ‘स्वयं रक्तदाता जिल्हा रक्तदाता जिल्हा समिती’ द्वारा उप- जिल्हा रुग्णालय, आरमोरी, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात सरिता दुधे सिस्टर, रविकांत वैद्य, राजकुमार सरपे, ओंकार सपट, आकाश कुथे, विशाल बुराडे, शशिकांत खरकाटे, मेघश्याम बेदरे, राकेश वाटगुरे, होमकांत राऊत, प्रतिश दुमाने, संदिप मंडल, अनिकेत श्रीरामे, शुभम जुमनाके, छगन बडोले, दिपरत्न सहारे, हिमांशू मातेरे, मिथून प्रधान, साजन दिवटे, सारंग वरंभे, दिपक सोनकुसरे इत्यादी २५ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
विशेषतः चारुदत्त राऊत, अध्यक्ष स्वयं रक्तदाता जिल्हा समिती, प्रफुल खापरे, अध्यक्ष, अर्बन निधी बँक आरमोरी, सौरभ माकडे, देवेंद्र कुथे, डॉ. आशिष दोनाडकर, देवानंद प्रधान, सहयोग शाखा आरमोरीचे ब्रंच मॅनेजर अरविंद मेश्राम, कवीश्वर खोब्रागडे, मुकेश लांजेवार प्रामुख्याने रक्तदात्यांना रक्तदानाकरिता प्रेरित करण्यात सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिर सफल करण्यासाठी डॉ. छाया उईके, डॉ. अभिजित मारभते, गौरी साळवे, आशिक वासनिक, माया पारधी सिस्टर, निकेसर सिस्टर, यांचे विशेष सहकार्य लाभले.
जिल्हा रक्तपेढी गडचिरोलीचे डॉ. गिऱ्हेपुंजे, कु. समता खोब्रागडे सिस्टर, राहुल सिडाम ब्रदर, देशमुख, बंडू कुंभारे इत्यादी रक्तसंकलण करण्यासाठी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #blooddonetcamp )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here