स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी ‘आमची मुलगी’

631

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन
The गडविश्व
मुंबई दि. १५ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘आमची मुलगी’ http://amchimulgimaha.in या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदर रामदास कदम, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी व सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आरोग्य सचिव नवीन सोना, आयुक्त धीरजकुमार, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महिलांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘आमची मुलगी’ या संकेत स्थळामुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच अवैध काम करणाऱ्या प्रवृत्तीला अळाही बसेल.
‘आमची मुलगी’ या संकेतस्थळामुळे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवणे, गर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३, (पीसीपीएनडीटी आणि एमटीपी) कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होणार आहे.
तसेच संकेतस्थळावर तक्रार नोंदविणे आणि शंकाचे निरसन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रार गोपनीय ठेवण्याची व तक्रारदाराची इच्छा असेल तर त्याचे नाव नोंदविण्याचीही संकेतस्थळावर व्यवस्था करण्यात आली आहे. संकेत संकेतस्थळावर प्राप्त तक्रारीचा निपटारा करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. संकेतस्थळावर प्राप्त तक्रारीनुसार तपासणीमध्ये यश आल्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत तक्रारदारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
(#thegadvishva #thegdv #cm_eknathshinde #amchimulgi #mumbai )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here