सर्वोच्च न्यायालयाचा ईव्हीएमवरील विश्वास कायम, बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिला नकार

591

– १९ लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले
The गडविश्व
मुंबई, दि. १५ : ​सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत आज १९ लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. १९ लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- INCP ने अशी भीती व्यक्त केली की, २०१६-१९ दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 1१९ लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये फेरफार करण्यासाठी केला गेला असता.
​लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे कलम 61A बाजूला सारुन बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातील आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना न्यायमूर्ती खन्ना यांनी निरीक्षण नोंदविले की ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर १० हून अधिक प्रकरणे तपासण्यात आली आहेत. न्यायालयाने वेळोवेळी याचिका फेटाळताना ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर नेहमीच विश्वास दर्शविला आहे.
​गेल्या दशकात आणि सुमारे ४० निकालांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोग EVM आणि या संबंधांतील पारदर्शक प्रक्रिया आणि कठोर प्रशासकीय कार्यप्रणालीवर त्यांची श्रध्दा आणि विश्वास कायम ठेवला आहे, त्यामुळे भारतात EVM च्या बाजूने मिळत असलेल्या न्यायाला प्रचंड मूल्य आणि सामर्थ्य मिळाले आहे.
एनसीआर न्यायालयाने, आपल्या निकालात, विद्यमान कार्यपद्धतीच्या मजबूती आणि पारदर्शकतेवर जोर दिला आणि याचिकाकर्त्यांचे दावे खोडून काढले.
​ईव्हीएम मॅन्युअल, स्टेटस पेपर, ईव्हीएम प्रेझेंटेशन, ईव्हीएमच्या ४० वर्षांच्या प्रवासावरील प्रगतीपुस्तक, ईव्हीएमचा कायदेशीर इतिहास यासारख्या प्रकाशनांच्या स्वरूपात ईव्हीएमशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा उपायांची माहिती सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आणि सतत अद्ययावत केलेले EVM प्रश्नावलीबाबत भारत निवडणूक आयोग नेहमीच आघाडीवर आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #evm #voting #election #suprimcort )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here