व्येंकाटरावपेठा येथे पूल वजा बंधारा बांधकामाचे जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

214

– परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय
The गडविश्व
अहेरी, २९ डिसेंबर : तालुक्यातील ग्रा.प.व्येंकाटरावपेठा येथील धर्मराव शाळेपासू ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाला असल्याने पूल वजा बंधारा बांधकामाचे जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
सदर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडुन ३० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले.
व्येंकाटरावपेठा येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पावसाळ्यात नाल्यावर पाण्याचा प्रवाह खूप राहत असल्याने व मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील स्थानिक नागरिकांना व शेतकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता कंकडालवार यांनी स्वतःनाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिली होती. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत वैकटरावपेठा नाल्यावार पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा येथील जनतेला दिलेली ग्वाही पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अहेरी तालुक्यातील हा तिसरा पूल वजा बंधारा बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. मात्र माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्ष बनले तेंव्हा या नाल्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून तिसऱ्यांदा तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे. या पूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
पूल वजा बंधाऱ्यांचा भूमिपूजन कार्यक्रमाला अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ.मिनाताई गर्गम ग्रा. पं.सदस्य, जयाबाई तेलंगे ग्रा.प.सदस्य, शामराव राऊत माजी उपसरपंच गुलाबराव सोयाम ग्रा.प.सदस्य, दिलीप मडावी सरपंच, महेश दहागवकर, रवी सडमेक, विश्वेश्वर पागे, नारायण राऊत, लव खुश आईलवार, करण वनपाकलवार, हरिबाबा राऊत राजु भोयर, संदीप राऊत. शिपाई ग्रा.पं, शंकर वनपाकलवार, शंकर कांबळे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी, नरेंद्र गर्गम, केशव सडमेक, संपत मडावी, सदाशिव राऊत, प्रकाश पेंदाम, डौलत कनाके, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here