रेती अभावि रांगी परिसरातील घरकुल लाभार्थी बांधकामापासुन वंचित

268

– रेती उपलब्ध करून देण्याची लाभार्थ्यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २८ डिसेंबर : तालुक्यातील रांगी परिसरामध्ये मागिल वर्षी अनेकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. परंतु लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाकरिता रेती उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुल रखडलेले आहेत.
रांगी परिसरात लहान मोठे गावे असुन येथील लोकांना शासनाच्या वतीने घरकुल मंजूर झालेले आहेत. हे सर्व लाभार्थी गोरगरीब लोकांना घरकुल योजनेचा लाभ देत असताना शासनाने रेती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. २०कि.मी. परिसरामध्ये लिलावाची रेती कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील अनेक लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित झालेले आहेत.
लाभार्थी हे आदिवासी आणि गोरगरीब असल्याने बाहेरगावाहून लिजची रेती आणणे वाक्याबाहेर आहे. अतिरिक्त पैसे देऊन खरेदी करून आणलेली रेती ही लाभार्थ्यांना परवडणारी बाब नाही. त्यामुळे लिलावातील रेती लाभार्थी आणून स्वतःचं घरकुल बांधकाम पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष देऊन रांगी परिसरात घरकुल बांधकामाकरिता रेती उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here