– गडचिरोली येथील नागरिकांचा समावेश
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २६ : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घटना आंबेटाकळी – बोरी आडगाव रस्त्यावर रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच ३३ ए सी. २३६६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने सर्वजण शेगावकडे जात होते. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित झाल्याने उलटली. यात देवराव रावजी भंडारकर (वय ५५ ) यांचा यांचा मृत्यू झाला तर सौ. कांता देवराव भंडारकर (वय ५०) रा. कुंभीतोला, जयदेव नामदेव नाकाडे (वय ४०) तळेगाव, जयश्री राऊत (वय १६) , समृद्धी कुंभलवार (वय ६) सर्व राहणार गडचिरोली असे चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयातील प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले अशी माहिती आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #accident )