जनतेचा आधार, विकासाचा ध्यास ; डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस आज सेवाकार्यातून साजरा

61

जनतेचा आधार, विकासाचा ध्यास ; डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस आज सेवाकार्यातून साजरा
– संघर्षातून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतचा प्रवास; जनसेवा, विकास आणि साधेपणाची वेगळी ओळख
The गडविश्व
गडचिरोली, दि. १ : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस आज (१ जुलै) गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा संघर्षमय राजकीय प्रवास, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेशी असलेली नाळ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. नेते यांनी कोणत्याही राजकीय वारशाशिवाय अथक परिश्रम, सातत्यपूर्ण लोकसंपर्क आणि जनसेवेच्या बळावर कार्यकर्ता ते आमदार, खासदार आणि पुढे भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री असा उल्लेखनीय प्रवास केला. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण संघर्षातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

खासदार म्हणून कार्यकाळात त्यांनी संसदेत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी, युवक, पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि नक्षलग्रस्त भागातील विकासाचे प्रश्न सातत्याने मांडले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे वडसा–गडचिरोली रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सूरजागड लोह प्रकल्प, कोनसरी स्टील प्रकल्प, वैद्यकीय व कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, एकलव्य विद्यालये, सिंचन योजना आणि विविध विकासकामांना गती मिळाल्याचे मानले जाते.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क कायम ठेवत नागरिकांच्या समस्या सोडविणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, विद्यार्थ्यांना मदत करणे आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी सहकार्य करणे ही जनसेवेची परंपरा अखंड सुरू ठेवली आहे.

राष्ट्रीय स्तरावर संघटनाची जबाबदारी

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी देशातील विविध राज्यांत संघटन विस्तार, आदिवासी समाजाशी संवाद आणि पक्ष बळकटीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या संघटन कौशल्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

साधेपणामुळे जनतेत लोकप्रिय

सामान्य नागरिकांशी सहज संवाद, कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता, सर्व समाजघटकांप्रती समान दृष्टिकोन आणि विकासासाठी सातत्याने धडपड हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू मानले जातात. सत्ता अथवा पद नसतानाही जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून डॉ. नेते यांची ओळख निर्माण झाली आहे.

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण होणार असून त्यानंतर सेमाना देवस्थान येथे दर्शन व वृक्षारोपण करण्यात येईल. वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, महिला व बाल रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजन व फळवाटप, तसेच सायंकाळी गोविंदपूर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, डॉ. नेते यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही केक न कापता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. या सर्व कार्यक्रमांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा मोर्चा तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून समाजसेवा, विकास आणि जनविश्वासाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा दिवस असल्याची भावना कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here