The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात आज 215 कोरोना तपासण्या करण्यात आल्या त्यापैकी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही तर जिल्ह्यात
उपचार सुरू असलेल्या एका कोरोनाबधित रुग्णांने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे.
जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37 हजार 418 रुग्णांपैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36 हजार 646 एवढी आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता निरंकआहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.














