वैनगंगा नदी पात्रात बुडून बालकाचा मृत्यू

961

– कुटुंबासोबत गेला होता देवदर्शनासाठी
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील वैनगंगा नदी पात्रात बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. अद्विन प्रदीप भांडेकर रा.रामपूरी वार्ड गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, भांडेकर कुटुंब मार्कंडा येथे देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान देवदर्शन केल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य नदी पात्रात गेले असता यावेळी अद्विन सुद्धा नदी पाण्यात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून भांडेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here