धानोरा महसूल विभागाचा मध्यरात्री ‘सर्जिकल स्ट्राईक’; अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

71

धानोरा महसूल विभागाचा मध्यरात्री ‘सर्जिकल स्ट्राईक’; अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २८ : तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कडक भूमिका घेत धडक कारवायांचा सपाटा सुरू केला आहे. तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. २६) रात्री उशिरा उदेगाव येथे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात जप्त करण्यात आला. या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या कारवाईची तालुकाभर जोरदार चर्चा सुरू आहे.
महसूल विभागाला उदेगाव परिसरातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार जप्त वाहन उदेगाव येथील आकाश तुलावी यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी ट्रॅक्टर तहसील कार्यालय, धानोरा येथे जमा करण्यात आला आहे.
या धडक मोहिमेत नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, मंडळ अधिकारी विलास मुपीडवार, ग्राम महसूल अधिकारी दिलीप डोंगरे व अक्षय शेडमाके, तसेच वाहन चालक आशिष पोरेड्डीवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तालुक्यात अवैध गौण खनिज उपसा व वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियम मोडणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here