शासकीय सेवेत कार्यरत युवकांचा कढोलीत भव्य सत्कार सोहळा

12

शासकीय सेवेत कार्यरत युवकांचा कढोलीत भव्य सत्कार सोहळा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २० : जय भीम पॅंथर बौद्ध समाज, कढोली (वार्ड क्र. १) यांच्या वतीने आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये शासकीय सेवेत कार्यरत युवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. गावातील कर्तृत्ववान युवकांचा गौरव करताना उपस्थितांनी अभिमान व्यक्त केला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत कार्यरत शुभम जिडकुंटवार तसेच आरोग्य विभागातील नरेश इंदूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य पी. आर. आकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच किरण आकरे, माजी सरपंच चंद्रकांत चौके, दिलाराम मानकर, गुणवंत दडमल, आनंदराव आकरे, शालिक जनबंधू, सेवा सहारे, फाल्गुन चौके, धीरज आकरे, मोहित आकरे, सुरेश गावतुरे, भास्कर दडमल, लोमेश कोटांगले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चांगदेव फाये, पी. आर. आकरे, दिलाराम मानकर, चंद्रकांत चौके, गुणवंत दडमल, किरण आकरे आदी मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन करताना शासकीय सेवेतून समाजसेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय आजाद कलापथक, निळा निशान शाखा (नवेगाव, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) तसेच राष्ट्रीय जनजागृती त्रिगुणी निशाण पार्टी, शाखा आळका (ता. कामठी, जि. नागपूर) यांच्या वतीने सादर करण्यात आलेला शाहिरी आणि जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रम. शाहीर जयाताई बोरकर, भास्कर केळझर, आदेश खडसे, आकाश खडसे, सोपान खडसे, युवराज बोरकर तसेच शाहीर मारुती मारभते, शेखर टिचकुले, बंट्या ढेकलजी, रामटेके, भीमराव दिघोरे यांच्या कलाप्रदर्शनाने कार्यक्रमाला रंगत आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव आकरे यांनी केले, प्रास्ताविक गुड्डू इंदूरकर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन रोहित आकरे यांनी केले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जय भीम पॅंथर बौद्ध समाज कढोलीचे अध्यक्ष यश्वनंद इंदूरकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here