अबब… दुचाकीसमोर अचानक रानटी हत्तींचा कळप ; कुरखेडा–वडसा मार्गावर धडकी भरवणारा क्षण कॅमेऱ्यात कैद

181

अबब… दुचाकीसमोर अचानक रानटी हत्तींचा कळप ; कुरखेडा–वडसा मार्गावर धडकी भरवणारा क्षण कॅमेऱ्यात कैद
The गडविश्व
गडचिरोली, दि.१९ : कुरखेडा–वडसा मार्गावर आज सकाळी घडलेल्या थरारक घटनेने नागरिकांची अक्षरशः धडकी भरली. रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वारासमोर अचानक रानटी हत्तींचा कळप आडवा आल्याने काही क्षणांसाठी तो स्तब्ध झाला. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, या कळपात सुमारे २० रानटी हत्तींचा समावेश असून, ते गेल्या महिनाभरापासून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव परिसरात धुमाकूळ घालत आहेत. मका, धान आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर आता हा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज सकाळी कुरखेडा–वडसा मार्गावरून प्रवास करत असताना दुचाकीस्वाराला समोरच हत्तींचा कळप दिसताच त्याची धडधड वाढली. काही क्षण तो जागीच थांबला मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने शांतपणे दुचाकी मागे फिरवत स्वतःचा जीव वाचवला. या घटनेमुळे काही काळ मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली.
दरम्यान, हा संपूर्ण थरार एका प्रवासी वाहनातील कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हत्तींच्या कळपाच्या हालचालीमुळे परिसरात भीतीसोबतच कुतूहलाचे वातावरणही निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभाग व प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून हत्तींचा कळप सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने वळवावा, अशी मागणी केली आहे. तसेच, नागरिकांनी अनावश्यकपणे या मार्गावर वावर टाळून सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #WildElephants #ElephantHerd #BreakingNews #ViralVideo #RoadIncident #WildlifeAlert #ForestDepartment #MaharashtraNews #KurKheda #Wadsa #HumanWildlifeConflict #StayAlert #TrendingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here