आलापल्लीत वनविभागाची धडक कारवाई; डझनभर शिकारी जेरबंद

121

आलापल्लीत वनविभागाची धडक कारवाई; डझनभर शिकारी जेरबंद
– वन्यजीवांचे अवयव व शिकारी साहित्य जप्त; कायदेशीर कारवाईला वेग
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने राबविलेल्या धडक कारवाईत डझनभर शिकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून वन्यजीवांचे अवयव आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जंगलातील अवैध शिकारीच्या प्रकारांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जंगल परिसरात काही जण शिकारीसाठी दबा धरून बसल्याचे उघड झाल्यानंतर वनविभागाने तात्काळ गस्ती पथक सक्रिय केले. नियोजनबद्ध सापळा रचत संशयितांचा पाठलाग करण्यात आला आणि अखेर १२ जणांना ताब्यात घेण्यात यश आले.
या कारवाईदरम्यान शिकाऱ्यांकडून चार शेकरू, एक उडनारी खार, एक हरीनाल पक्षी तसेच घुबड प्रजातीतील पक्षी व इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले. या घटनेने वन्यजीवांच्या अवैध शिकारीचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.
सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक सौ. दिपाली तळमले व उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांच्या नेतृत्वात पार पडली. मोहिमेत क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
वन्यजीव संरक्षणासाठी वनविभाग सज्ज असून अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाया राबविण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ForestDepartment #Aheri #Alapalli #Gadchiroli #WildlifeCrime #Poaching #ForestAction #WildlifeProtection #IndiaNews #BreakingNews #Environment #SaveWildlife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here