क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती कुरखेड्यात उत्साहात साजरी

25

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची १९९ वी जयंती कुरखेड्यात उत्साहात साजरी
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि.११ : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त कुरखेडा येथील महात्मा फुले चौकात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाचा संदेश देणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक आसाराम माकडे व मा. उद्धवराव राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
माळी समाज संघटना व अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष शाम सोनुले, जिल्हा सल्लागार प्रा. डॉ. दशरथ आदे, अंनिस शाखा अध्यक्ष सुरेश दहीकर, तसेच राजेंद्र बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोलीचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य सी. एल. डोंगरवार यांनी महात्मा फुलेंनी अन्यायकारक रूढी-परंपरांविरोधात उभे राहून केलेल्या कार्याचा आढावा घेत आजच्या परिस्थितीत त्या विचारांची गरज अधोरेखित केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस राम लांजेवार यांनी फुले दांपत्याने वंचित व बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या विचारांचा प्रसार भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व व्यक्त केले.
पुढील वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विविध उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमास सौ. अरुणाताई राऊत, सौ. सुनीता आदे, सौ. माधुरीताई मुंगमोडे, सौ. मिनाक्षी आत्राम, सौ. शेंडे मॅडम, सौ. भैसारे मॅडम, कु. वैष्णवी माकडे, रवींद्रजी कुंभारे, पुरुषोत्तम भरणे, आत्राम सर, ओमप्रकाश सहारे तसेच बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शाम सोनुले यांनी केले, तर आभार केवळराम खुणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here