“हर्षाली दडमल” ठरली भामडेलीची पहिली महिला पोलिस : जल्लोषात सन्मान सोहळा

32

“हर्षाली दडमल” ठरली भामडेलीची पहिली महिला पोलिस : जल्लोषात सन्मान सोहळा
The गडविश्व
भद्रावती, दि. ०९ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भामडेली गावातील कु. हर्षाली सुखदेव दडमल हिने चंद्रपूर पोलिस दलात भरती होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत तिने मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
हर्षाली ही भामडेली गावातील पहिली महिला पोलिस ठरली असून, तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल गावात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. गावकऱ्यांच्या वतीने तिचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितांनी हर्षालीवर पुष्पवृष्टी करत तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इतर मुलींनीही तिचा आदर्श घेऊन शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
हर्षालीच्या यशामागे तिची आई दुर्गाबाई आणि वडील सुखदेव दडमल यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या कष्ट आणि पाठिंब्याबद्दल गावकऱ्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
हर्षाली दडमल ही केवळ भामडेलीच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीतील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरत असून, तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #policerecutment #HarshaliDadamal #FirstWomanPolice #VillagePride #WomenEmpowerment #Inspiration #SuccessStory #ChandrapurPolice #RuralAchievement #GirlPower #BreakingBarriers #MaharashtraNews #ProudMoment #Motivation #PoliceRecruitment #WomenInUniform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here