इंटरशिप पूर्ण : विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन

66

इंटरशिप पूर्ण : विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २७ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात २७ मार्च २०२६ रोजी स्किल रूट संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या व्यवसाय शिक्षण उपक्रमांतर्गत इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य सुरजसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी तसेच भविष्यातील करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाऊन आपल्या क्षमतांचा विकास करावा, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास डॉ. रश्मी डोके, बुरमवार, विलास भोगे, व्यवसाय शिक्षक पठाण, दरडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here