गडचिरोली पोलीस भरतीच्या गुणांची यादी जाहीर ; आक्षेपासाठी फक्त 24 तासांचा अवधी!

123

गडचिरोली पोलीस भरतीच्या गुणांची यादी जाहीर ; आक्षेपासाठी फक्त 24 तासांचा अवधी!
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मैदानी व लेखी चाचणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा 18 मार्च 2026 रोजी, तर पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी पार पडली होती. या परीक्षांतील उमेदवारांचे गुण आता संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत.
सदर गुणांची यादी पाहण्यासाठी उमेदवारांनी गडचिरोली पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ www.gadchirolipolice.gov.in ला भेट द्यावी.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत कोणत्याही उमेदवाराला आक्षेप असल्यास, यादी प्रसिद्ध झाल्यापासून केवळ 24 तासांच्या आत आक्षेप नोंदवणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेनंतर सादर होणारे आक्षेप ग्राह्य धरले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे सर्व उमेदवारांनी तातडीने आपले गुण तपासून, आवश्यक असल्यास वेळेत आक्षेप नोंदवावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #policerecrutment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here