मौशिखांबचा तरुण ठरला ‘आरोग्यदूत’; आयुर्वेदाने ग्रामीण रुग्णांना दिलासा

143

मौशिखांबचा तरुण ठरला ‘आरोग्यदूत’; आयुर्वेदाने ग्रामीण रुग्णांना दिलासा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव असताना मौशिखांब येथील अमोल उंदीरवाडे या तरुणाने आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा अनोखा आदर्श उभा केला आहे. आंबेडकर चौकात सुरू केलेल्या त्यांच्या आयुर्वेदिक उपचार केंद्रामुळे परिसरातीलच नव्हे, तर दूरवरच्या रुग्णांनाही मोठा दिलासा मिळत असून, या केंद्राची ख्याती आता नेपाळपर्यंत पोहोचली आहे.
किडनी स्टोन, लकवा (पॅरालिसिस), मणक्याचे विकार यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांची येथे दररोज मोठी गर्दी होत आहे. पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर आधारित औषधोपचारांमुळे अनेक जुनाट व गुंतागुंतीच्या आजारांवर सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने रुग्णांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.
या केंद्रात वातविकार, हृदयविकार, मूळव्याध, किडनी स्टोन, पित्ताशयातील खडे, लिव्हर इन्फेक्शन, गाठी, गॅंग्रीन यांसह मणका, मान, कंबर व गुडघ्यांचे विकार तसेच स्त्रीरोगांवरही उपचार केले जातात. शरीरातील सुन्नपणा, मुंग्या येणे, सूज, वारंवार लघवी होणे अशा तक्रारींवरही येथे उपचार उपलब्ध आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर सहाय्यक उपचार देण्याचाही प्रयत्न येथे केला जात आहे.
महागड्या शहरी उपचारांच्या तुलनेत अत्यल्प खर्चात सेवा उपलब्ध करून देणारे हे केंद्र ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ‘आरोग्य संजीवनी’ ठरत आहे. अनेक रुग्णांनी उपचारानंतर प्रकृतीत झालेला फरक अनुभवत इतरांनाही येथे येण्याचा सल्ला दिल्याने या केंद्राबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरावेत यासाठी रुग्णांनी पथ्याचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शिस्त आणि संयम ठेवल्यास अनेक असाध्य आजारांवरही मात करता येते,” असे अमोल उंदीरवाडे यांनी सांगितले.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील मर्यादा ओळखून एका स्थानिक तरुणाने उभारलेली ही सेवा आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here