रमजान ईदनिमित्त कुरखेड्यात पोलीसांचा सत्कार

78

रमजान ईदनिमित्त कु रखेड्यात पोलीसांचा सत्कार
– सामाजिक सलोख्याचा संदेश
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २२ :रमजान ईदचे औचित्य साधत कु रखेडा येथील ईदगाह मैदानात मुस्लिम समाज मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ तसेच थंडपेय देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक एकात्मता व सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला.
कुरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावेत तसेच सर्वधर्मीयांमध्ये सलोखा कायम राहावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, ठाणेदार महेंद्र वाघ व पोलीस उपनिरीक्षक संदिपकुमार ताराम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल सातत्याने दक्षतेने कार्यरत आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत मुस्लिम समाज मंडळाने पोलीस उपनिरीक्षक संदिपकुमार ताराम व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला.
या प्रसंगी मुस्लिम समाज मंडळाचे अध्यक्ष मसूद शेख, हाजी मूर्तूजा शेख, हाजी मुजफ्फर शेख, हाजी बब्बू मस्तान, अयुब खान, सईद शेख, शाकीर पठाण यांच्यासह नगरपंचायत उपाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, आसिफ शेख, जमील शेख, तौसीफ शेख, जावेद शेख, शकील शेख, तौकीर शेख, एजाज शेख, रियाज शेख, नौशाद शेख, न्याय सय्यद, उस्मान खान आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सामाजिक ऐक्य आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here