तृतीयपंथीयांसाठी केंद्राची नॅशनल हेल्पलाईन – १४४२७

73

तृतीयपंथीयांसाठी केंद्राची नॅशनल हेल्पलाईन – १४४२७
– नोंदणीसाठी स्वतंत्र पोर्टल ; हक्क संरक्षण व कल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ८ : राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याण मंडळ स्थापन करण्याचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणात समाविष्ट करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ व नियम, २०२० देशभर लागू असून, त्याअनुषंगाने तृतीयपंथीय समाजासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे.
या पोर्टलद्वारे तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक – १४४२७ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना विविध समस्या, तक्रारी व मार्गदर्शनाबाबत तत्काळ सहाय्य मिळणार आहे. तसेच पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींनी नोंदणी करून शासकीय योजना व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, गडचिरोली यांनी केले आहे.
तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही हेल्पलाईन व पोर्टल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here