धक्कादायक : पाथरी पोलिसांनी बनावट विदेशी दारूसह ६.७८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

145

धक्कादायक : पाथरी पोलिसांनी बनावट विदेशी दारूसह ६.७८ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
– तिघेजण तस्कर अटकेत
The गडविश्व
चंद्रपूर, दि.२३ : पाथरी पोलिसांनी शनिवारी सकाळी अवैध बनावट विदेशी दारू तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून तीन तस्करांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूव्यवसायांना मोठा धक्का बसला आहे.
पोलीस स्टेशन पाथरीचे ठाणेदार सपोनि नितेश डोर्लीकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाथरी मार्गावर नाकाबंदी उभारली. तपासणीदरम्यान स्विफ्ट डिझायर (MH40 AR 6803) आणि सुजुकी अॅक्सेस मोपेड (MH34 CP 2798) यांना थांबवून तपासण्यात आले असता वाहनांतून रॉयल स्टॅग कंपनीच्या ३८४ सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केल्यावर या सर्व बाटल्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दारू, कार, मोपेड, तीन मोबाईल असा एकूण ६,७८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कृष्णा धर्मा कंजर (19), प्रकाश रमेश भोयर (37) आणि सागर राजेश कंजर (32) (जि. चंद्रपूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गोविंद चाटे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार डोर्लीकर व त्यांच्या पथकाने राबविली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #chandrpurnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here