परसवाडी ग्रामसभेत स्थानिक प्रश्नांसह जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा

55

परसवाडी ग्रामसभेत स्थानिक प्रश्नांसह जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा
– अविनाश पोरेटी यांच्या उमेदवारीस ग्रामस्थांचा एकमताने पाठिंबा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०२ : तालुक्यातील परसवाडी येथे 1 नोव्हेंबर 2025 रोजी नवग्रामसभांच्या अध्यक्षांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध स्थानिक प्रश्नांबरोबरच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान, ओल्या धानाचे सडणे, कापणीपश्चात साठवणुकीची अडचण, तसेच तातडीने पंचनामे करून मदत वितरणाची गरज यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करणे, ई-केवायसी व आधार कार्ड अद्ययावत करणे या विषयांवरही सूचना देण्यात आल्या.
ग्रामसभेत चातगाव–कारवाफा जिल्हा परिषद क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा करताना अविनाश विमल शामराव पोरेटी यांना उमेदवार म्हणून पुढे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दर्शविला.
ग्रामसभेत तालुक्यातील विविध विकासकामे, शेतकरी प्रश्न आणि ग्रामविकासासाठीच्या पुढील योजनांवरही विचारमंथन झाले. या बैठकीत स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here