आंचिव हायस्कूल, चिखली येथे विद्यार्थिनींना सायकल वाटप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : मानव विकास योजनेअंतर्गत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चिखली येथील आंचिव हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तब्बल २९ विद्यार्थिनींना सायकली देण्यात आल्या.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक डहाडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक महेश बनोठे, प्रल्हाद सहारे, गुलाब टेंभुर्णे, मनेश मडावी, गोपाल लाडे, जानबा भोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींच्या शालेय शिक्षणाला चालना देणे, शाळेतील उपस्थितीत वाढ घडविणे व प्रवासातील अडचणी कमी करणे हा होता. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत येणे-जाणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होतील.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त करत “शिक्षणासाठी नवीन प्रेरणा मिळाली” अशी भावना व्यक्त केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













