The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर रोजी अनुकंपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पोलिस विभागासह राज्य शासनाच्या तब्बल ५१ विभागांचा समावेश असून, संबंधित अर्ज व प्रकरणांचा निपटारा जिल्हाधिकारी कार्यालयात केला जाणार आहे.
या मेळाव्यात ‘क’ वर्ग पदांवरील प्रकरणांचा विचार होणार असून, शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सुचविलेल्या रिक्त पदांची यादी जाहीर झाली असून, विविध १३ विभागांकडून एकूण ५३ पदांची मागणी प्राप्त झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात २८६ उमेदवारांची सामाईक प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. मेळाव्यात उमेदवारांचे समुपदेशन करून संबंधित विभागांना नियुक्तीसाठी शिफारस केली जाणार आहे.
“अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणांचे त्वरित निवारण करून पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणे, हा प्रशासनाचा उद्देश आहे,” असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #CompassionateAppointment #AnukampaMelava #Gadchiroli #JobFair #GovernmentJobs #Recruitment #WaitingList #EmploymentOpportunity #अनुकंपानियुक्ती #अनुकंपामेळावा #गडचिरोली #सरकारीनोकरी #रोजगारसंधी #भरती #प्रतीक्षायादी #नियुक्ती













