पेंढरी को-ऑप. बँकेत लिंक फेल ; शेतकऱ्यांचा पोळा सण कोरडाच

198

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २२ : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भाग पेंढरी येथील दि डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. ऑप. बँकेत गेल्या अनेक दिवसांपासून लिंक फेलची समस्या कायम असून त्यामुळे खातेदारांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. विशेषत: पोळा सणानिमित्त पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकरी व ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. परिणामी शेतकऱ्यांचा पोळा सण अक्षरशः कोरडाच जाण्याची वेळ आली आहे.
पेंढरी शाखेत परिसरातील ३० ते ४० गावांतील शेतकरी, महिला, मजूर आणि कर्मचाऱ्यांची खाती आहेत. मात्र वारंवार लिंक फेल होणे, रोख रक्कम वेळेवर उपलब्ध न होणे, ५ हजारांपेक्षा जास्त रक्कम न देणे अशा तक्रारींमुळे खातेदार प्रचंड त्रस्त झाले आहेत. आधीच डोंगराळ भाग, मर्यादित वाहतूक व्यवस्था आणि रोजच्या गरजांसाठी पैशांची अडचण असताना, बँकेच्या या समस्येमुळे नागरिकांना अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
नागरिकांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असली तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने संताप वाढला आहे. रोज बँकेत गर्दी करुनही अपेक्षित रक्कम न मिळाल्याने ग्राहकांना भ्रमनिराश होऊन घरी परतावे लागत आहे.
या गंभीर समस्येकडे बँक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खातेदारांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhnaoranews #Dhanora #Pendhri #CooperativeBank #LinkFailure #FarmersIssues #CustomerProblems #BankServices #Polafestival #Gadchiroli #TheGadVishva
#धानोरा #पेंढरी #कोऑपरेटिव्हबँक #लिंकफेल #शेतकरी #ग्राहकत्रास #बँकसमस्या #पोळासण #गडचिरोली #Theगडविश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here