स्वयं रक्तदाता जिल्हा समितीकडून नारदेलवार कुटुंबास सानुग्रह निधीचे वितरण

1051

– पहिल्यांदाच एका रक्तदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत निधी वाटप
The गडविश्व
गडचिरोली : ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ च्या वतीने पहिल्यांदाच एका रक्तदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत निधी काल १५ फेब्रुवारी २०२२ रोजी वितरण करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव/ ठाणेगाव येथील रक्तदाता ओमकार भोलेनाथ नारदेलवार यांचे जानेवारी महिन्यात विद्युत खांबावरून पडून अपघाती निधन झाले. स्वयं रक्तदाता जिल्हा समिती च्या माध्यमातून त्यांनी रक्तदान केले असल्याने काल स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या वतीने या रक्तदात्याच्या कुटुंबाकडे अपघात सानुग्रह निधी वितरित करण्यात आले.
‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ हि गडचिरोली जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना वेळीच रक्तपुरवठा करण्यात येतो. या समितीच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा अपघात सानुग्रह केला जातो. अनावधाने जर रक्तदात्याचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा या समितीच्या माध्यमातून मृत्यू झालेल्या रक्तदात्याच्या कुटुंबास सानुग्रह देण्यात येतो असे या ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ विशेष आहे. आतापर्यंत अनेक गरजू रुग्णास या समितीच्या माध्यमातून रक्तपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातही या समितीच्या माध्यमातून रक्तदान करण्यास अनेक रक्तदाते समोर येत आहेत.
समितीच्या माध्यमातून एकूण सानुग्रह निधी २० हजार रुपये देण्यात येणार असून ते १० टप्प्यात देण्यात येणार आहे. काल त्यापैकी पहिल्या टप्प्यात २००० रुपये सानुग्रह निधी वितरित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच एका रक्तदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत निधी देण्यात आली आणि हि व्यवस्था प्रत्येक रक्तदात्यांसाठी लागू राहणार आहे. सदर सानुग्रह निधी स्वयं रक्तदाता जिल्हा समिती अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, सचिव मनोज पिपरे, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर यांच्या देखरेखीखाली ‘स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती’ च्या बचत रक्कमेतून वितरित करण्यात येत आहे. यात कोणत्याही शासकीय योजनांचा किंवा विमा कंपनीचा सहभाग नाही.
सानुग्रह निधी रक्कम रक्तदाता ओमकार भोलेनाथ नारदेलवार यांच्या आई- वनिता नारदेलवार आणि वडील- भोलेनाथ नारदेलवार यांच्याकडे सोपवण्यात आली. याप्रसंगी स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, सामाजिक कार्यकर्त्या चंदाताई राऊत, , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दोनाडकर, आरोग्य सहाय्यक ठाणेगाव – डोंगरगाव शशिकांत मडावी , सौ. रंजनाताई नारदेलवार, नकूजी ढोरे, भास्कर खरकाटे, सचिन नारदेलवार, दुशांत कुकडकर, स्वप्निल कुकडकर, शुभम वैरागडे, उमेश पिंपळकर, स्वप्निल जुवारे, संचालक,आरमोरी अर्बन निधी लिमिटेड बँक अंकुश गेडाम व नेपचंद्र पेलने, आशिष नैताम, आक्रोश शेंडे, अक्षय ठाकरे, हरीश नैताम, गावातील इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
“रक्तदान श्रेष्ठदान” रक्तदान करून एखाद्याच्या जीव वाचविण्यास मदत होऊ शकते, मनुष्याला फक्त एका मनुष्याच्याच रक्ताची गरज आहे आणि हि मोलाची भूमिका बजावण्यासाठी मानवाने पुढे येऊन रक्तदान अवश्य करावे असे आवाहन स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांनी यावेळी केले. रक्तदान विषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या सदस्यांसोबत संपर्क करावे असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here