सुरजागड लोहखनीजाची माती शेतशिवारात साचत असल्याने शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

207

– शेतकऱ्याने तक्रार करूनही संबधित विभागाचे दुर्लक्ष
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीच्या पायथ्याशी असलेल्या मल्लमपल्ली येथील शेतशिवारात लोहखनिजाची माती वाहत जावून शेतात साचत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकासान होत आहे. याबाबत शेतकऱ्याने तक्रार दाखल केली होती. दोन दिवसापूर्वी याच शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची केल्याची घटना उघडकीस आली. आपल्या शेतात लोहखनिजाची लाल माती साचल्याने उत्पन्न होणार नाही याच कारणामुळे शेतकऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची चर्चा जोर धरत आहे. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा सुरजागड लोहखनिज खाण नागरिकांच्या जिव्हारी उठल्याचे चित्र दिसून येत आहे.
अजय दिलराम टोग्गो (३८ ) रा. मल्लमपल्ली असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकऱ्याची शेतजमीन सुरजागडच्या पायथ्याशी आहे. सुरजागड पहाडीवर लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. परिसरातील नागरिकांचा सादर लोहखनिज उत्खननास विरोध असतानाही उत्खननाचे काम सुरु करण्यात आले. आता या लोहखनिज उत्खनाने लाल माती वाहून शेतशिवारात साचत आहे. सदर लाल माती मृतकाच्या शेतात वाहुन येत साचून होती. याबाबत तक्रार देवूनही कोणीती दखल न घेतल्यानेच आत्महत्येचे पाऊल शेतकऱ्याने उचलल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरजागड लोहखनिज खाण नागरिकांच्या जिव्हारी उठल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा महापूर व अतिवृष्टीतने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र मल्लमपल्ली येथे शेतशिवारात सुरजागड पहाडीच्यावर सुरु असलेल्या लोहखनिज उत्खननाने माती शेतात वाहून येत असल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here