येवली येथे हनुमान जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती शिबीर

398

– येवली ग्रामपंचायतचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील येवली येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने हनुमान जयंतीचे औचित्य साधून व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून १९ जणांनी उपचार घेत व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्धार केला आहे.
गावातील रुग्णांना उपचार मिळावा, या उद्देशाने ग्रापंच्या वतीने व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील १९ रुग्णांनी उपचार घेत हनुमान जयंतीनिमित्त व्यसनमुक्त होण्याचा संकल्प घेतला आहे. यावेळी रुग्णांना समुपदेश करीत औषधोपचार करण्यात आले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत अरुण भोसले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच युवराज भांडेकर, ग्रापं सदस्य चोखाजी बांबोळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here