पोलिस विभागाच्या सहकार्याने अवैध दारूविक्री बंद करू

275

– धानोरातील महिलांना नगराध्यक्षांचे आश्वासन

The गडविश्व
गडचिरोली : धानोरा शहरातील काही वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ठराव घेऊन पोलिस विभागाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम यांनी शहरातील महिलांना दिले.
धानोरा शहरातील काही वार्डात मिळत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. शहरात दारू उपलब्धीमुळे कमी वयाचे मुले व्यसनी होत आहेत. शहरातील काही वार्डात अवैध दारू विक्री पूर्णत: बंद झाल्यास पुरुषांमधील दारू पिणे बंद होईल, घरात, वार्डात होणारे भांडण तंटे कमी होतील. यासाठी शहरातील विविध वार्डातील महिलांनी धानोरा नगरपंचायतचे नगराध्यक्षा सयाम यांची भेट देऊन निवेदन सादर केले. तसेच निवडणुकीदरम्यान दिलेल्या वचनाची अंमलबजावणी करीत अवैध दारूविक्री बंद करण्याची एकमुखी मागणी महिलांनी केली. यावेळी नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस विभागाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका सीमा थूल सुद्धा उपस्थित होत्या. निवेदन देतांना धानोरा शहरातील कार्यकर्ते राकडे महाराज ,शेवंता हलामी, भूमाला परचाके, मंगला मडावी, निराशा मडावी, शेवंता हलामी यांच्यासह तालुका संघटक अक्षय पेद्दीवार, तालुका प्रेरक भास्कर कड्यामी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here