दोन वेगवेगळ्या कारवाईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

1750

– जुगार अड्डा उद्वस्त करण्यात व खंडणी बहाद्दरांना अटक

The गडविश्व
गडचिरोली : दोन वेगवेगळ्या कारवाईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. अवैधरित्या चालविण्यात येणार जुगार अड्डा उद्वस्त करत २४ लाख १९ हजार ७२० मुद्देमाल जप्त करून ७ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ३ आरोपी फरार आहे त्यांचा शोध घेणे सुरु आहे तर दुसरी कारवाई गुड्डीगुडम येथील व्ही एम मतेरे इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे ऑफीसमध्ये जाऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. तर या कारवाईतील इतर आरोपी फरार आहेत. सदर दोन्ही कारवाई १२ मार्च रोजी करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईतील फरार आरोपींचा शोध घेण्यास पोलिसानांपुढे मोठे आव्हान उभे आहे. तर सदर दोन्ही कारवाईमुळे अवैध धंदे करणा­ऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळील एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागील शेतशिवारातील घरात अवैधरित्या जुगार अड्डा खेळला जातो अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे नेतृत्वाखाली सपोनि जाधव, सपोनि बोंडसे यांनी १२ मार्च रोजी घटनास्थळाचा शोध घेवुन आरोपीवर कारवाई करुन जुगार अड्डा उद्वस्त केला. यात घटनास्थळावरुन ८४ हजार रुपये रोख, ३ चारचाकी, १ दुचाकी, ५ मोबाईल व इतर साहित्यासह एकुण २४ लाख १९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या प्रकरणी राजु सैलु तराला (३७) रा. कलेक्टर ऑफिसजवळ, सुभेदार वार्ड पोस्ट जिल्हा हनमा कोंडा राज्य तेलंगाना , सुरेश कुमार पेदन्ना श्रीराम (५२) रा. वेनुराव कॉलनी (श्रीलक्ष्मी शिक्षीकेचे घरी) जिल्हा वरंगल राज्य तेलंगाना, रमन्ना कृष्णा रेड्डी थाडा (५०) रा. ज्योतीनगर जिल्हा करीमनगर राज्य तेलंगाना, मल्लेश ओदेलु मेकला (४५) रा. कॉलर माक्र्स कॉलनी, पोस्ट भोपालपल्ली जिल्हा जयशंकर राज्य तेलंगाना, रामचंदर बथुकैया वेमुला (५२) रा. गारेपल्ली जि. जयशंकर भुपालपल्ली राज्य तेलंगाना, धनंजय समय्या अकुबाडी (२४) रा. दुब्बागुडम ता. सिरोंचा जि. गडचिरोली, रामक्रिष्णा समय्या सोदारी(२०) रा. सिरोंचा जि. गडचिरोली अशा ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तीन आरोपी क्रिष्णाय वेमुला अंदाजे वय (३०) रा. गोदावरी खणी जि. पेदापल्ली राज्य तेलंगाना, थालारी रवीसागर अंदाजे वय (२५) रा. जानमपल्ली ता. सिरोंचा जि. गडचिरोली हे फरार आहेत. सदर आरोपीवर पोस्टे असरअल्ली येथे अप. क्र.१०/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर दुसरी कारवाई , मौजा गुड्डीगुडम येथील व्ही एम मतेरे इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे ऑफीसमध्ये जाऊन २५ लाख रुपयांची खंडणी जिमेला नाल्याजवळील पुलावर आणुन देण्याबाबतची मागणी हिरवे ड्रेस घातलेले ३ ते ४ बंदुकधारी इसमांनी केली होती. मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार गडचिरोली पोलीस दलाच्या गोपनिय पथकाने १२ मार्च रोजी जिमेला नाल्याचे पुलाजवळ जावुन सापळा रचला. दरम्यान मल्लेश मारय्या आऊलवार (२४) रा. राजाराम (खां.) ता. अहेरी जि. गडचिरोली, श्रीकांत सोमा सिडाम (२०) रा. चेरपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली हे जिमेला नाल्याच्या पुलाजवळ थांबुन होते. गोपनिय पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी साध्या वेषात पुलाजवळ गेले असता तुम्ही कोण आहात ? असे आरोपीनी विचारले, त्यावर अंमलदारांनी आम्ही रोडचे कामावरील मॅनेजर आहोत असे सांगताच हिरवे गणवेशधारी इसमांनी ठरविल्याप्रमाणे २५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. यावरुन गोपनिय पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेतले व पोस्टे अहेरी येथे आरोपीविरुध्द अप.क्र. ०१/२०२२ भादंवि कलम ३८७ व कलम ३४ अन्वये गुन्हा नोंद केला असुन सदर दोन्ही आरोपीना १७ मार्च २०२२ रोजी पर्यंत न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. यातील इतर आरोपी फरार आहेत.
सदर दोन्ही घटनेतील कारवाया एकाच दिवशी झाल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वरील दोन्ही घटनेचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
सदर दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दोन वेगवेगळया घटनेत जुगार अड्डा उद्वस्त करण्यात तसेच अवैध खंडणी वसुली करणा­या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई करणा­या पथकांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here