देसाईगंज : चोप येथे गोंड-गोवारी जमातीकडून ढाल व गायगोधन पूजन

560

– ४५० वर्षाची ऐतीहासिक पंरपरा
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २७ ऑक्टोबर : तालुक्यातील चोपय येथे ४५० वर्षाची परंपरा असलेली एतिहासिक व सांस्कृतीक वारसा लाभलेली गायगोधन व ढाल पूजनाची पंरपरा यावर्षीही कायम राखण्यात आली. चोप येथील गोंड-गोवारी जमातीच्या वतीने उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
गायी राखणे हा गोंड- गोवारी समाजाचा पारंपारीक व्यवसाय असल्याने लोक गायीची भक्तीभावाने पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. गायगोधनाच्या वेळेस ३० ते ४० टोपली शेणाचा ढिग करून त्यात कोंबडीचे अंडे व कोंबडीचे छोटे पिल्लू आतमध्ये ठेवून त्याची पूजा केली जाते. बाजूला घोणाड जातीचे गवत ठेवले जाते. गावचे शेंडया तिरू श्विाजी नेवारे हे पूजा करून आकर बांधतात व खिल्ला मुठंवा ची पूजा करतात. शेणाच्या ढिगावरून गावातील गायाी, बैल, शेळया नेल्या जातात. कोंबडीचे पिल्लू व अंडे सुरक्षित राहिले तर गोधन साधला असू म्हणतात.
चार वाजता गायगोधन शेंडया यांच्या परवानगीने घोनाड जातीचे गवत उचलून ते आपआपल्या गोठयात नेतात. खिल्ला मुठवा गुराचा वैध असल्यामुळे गुरांना कोणतेच रोग झाले नाहीत. नंतर ढालपुजाचा कार्यक्रम होतो. ढालीला सजवून व पाणी पाजून आकरावर आणल्या जाते. पारी कुपार लिंगो व माता रायताड जंगो याचे प्रतिक दोन मुखी ढाल व चारमुखी ढाल याचे पुजन होते. आकरावर भक्तीभावाने लोक पूजन करतात. गोंडगोवारी जमातीचे लोक उपरी, मालु, साखली यांच्या सहायाने नृत्य करतात. नंतर गावभर ढालीची मिरवणूक काढली जाते. सायंकाळी सामुहीक भोजन केला जातो. ढाल पूजनाचा कार्यक्रम डार जागरण ते ढाल पूजन पर्यत तिन दिवस चालतो.
या कार्यक्रमाला आदिवासी गोंड-गोवारी संस्कृती व कल्याण मंडळाचे जिल्हा सचिव धनराज दुधकवर, तालुकाध्यक्ष नानाजी दुधकवर, गावाचे अध्यक्ष चंद्रहास ठाकरे, शेंडया शिवाजी नेवारे, मोरेश्वर दुधकवर, ओम नेवारे, धनिराम दुधकवर, रविंद्र कालसर्पे, विजय राऊत, विवेक नेवारे, माधो सहारे, रमाकांत नेवारे, बंडूजी नेवारे, गणेश नेवारे, मुखरू चचाणे, सरपंच नितीन लाडे, हेमलमता दुधकवर, चंद्रकला नेवारे, शालु चचाणे, सुरेखा दुधकवर, राधाबाई कालसर्पे व गावकरी मंडळी इत्यादींचे सहकार्य लाभले.

४५० वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आदिवासी गोंडगोवारी जमातीची गायगोधन व ढालपूजन उत्सव आजही सुरू आहे. विदर्भातील साडेपाच हजार गावात हा उत्सव तिन दिवस राहणार आहे.
धनराज दुधकवर
जिल्हा सचिव, आदिवासी गोंडगोवारी जमाज संघटन गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here