दुर्गम भागातील २५ रुग्णांवर उपचार

151

The गडविश्व
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानातर्फे दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील कोयनगुडा व अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भेट देऊन एकूण २५ रुग्णांनी दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी उपचार घेतला आहे.
भामरागड तालुक्यातील कोयनगुडा येथील शिबिरात १३ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन आबिद शेख, रुपेश यांनी केले. वॉर्ड संघटनेकडून सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक अशोक गायकवाड, वासू हबका, मोतीराम गावडे यांनी सहकार्य केले. तसेच मेडपल्ली येथे सुद्धा गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. या उपक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक केशव चव्हाण यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेकरीता सरपंच निलेश वेलादी, पेसा अध्यक्ष भगवान मंगा मडावी, तालुका प्रेरक आनंद कुम्मरी यांच्यासह गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी बायफ संस्थेच्या केंद्र समन्वयक अल्का तलांडे उपस्थित होत्या.
दोन्ही शिबिराच्या माध्यमातून एकूण २५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिरादरम्यान पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तसेच समुपदेश साईनाथ मोहुर्ले यांनी सांगितले की, दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार आहे. या आजारातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांना दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, त्यांनी तालुका क्लिनिक किंवा गाव पातळीवरील शिबीराला भेट द्यावी अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here