जि.प.सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते छल्लेवाडा येथे प्रस्तुतिगृहाचे भूमिपूजन

265

The गडविश्व
अहेरी : तालुक्यांतील रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील आरोग्य विभागात प्रस्तुतीगृह उपलब्ध नव्हते. सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी केली असता जि.प.अध्यक्ष यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून दिले.
छल्लेवाडा प्रस्तुतीगृहासाठी निधी उपलब्ध झाल्याने आज रेपनपली-उमानूर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते सदर प्रस्तुतिगृहाचे भूमिपूजन करणयात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, विलास बोरकर, दासू कांबडे, मूरमाडे, इरसाद शेख व आरोग्य कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here