जि.प. उ.प्रा.शाळा मुरखळा (माल) येथे विविध स्पर्धेने भीमजयंती साजरी

194

The गडविश्व
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी केंद्रांतर्गत येत असलेल्या जि.प.उ.प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे काल १४ एप्रिल २०२२ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सर्वप्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुनांना वाव मिळावे यादृष्टीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त शाळेत विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामूख्याने निबंध स्पर्धा, पोष्टर स्पर्धा, वक्तुत्व स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य इ.१ ली ते ७ वी मधील निबंध स्पर्धेत एकुण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात पोष्टर स्पर्धेत एकुण २२, काव्यगायन स्पर्धेत एकुण ९ तसेच वक्तृत्व स्पर्धेत एकुण ५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
याप्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जिवन कार्याचा परिचय उपस्थित पालक, शिक्षक वृदांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन उपस्थित सर्वांना करुन दिले. विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल शाळेतील शिक्षक वृदांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोईनवार, पदविधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहाय्यक शिक्षक रमेश गेडाम, अशोक जुवारे, चंद्रकांत वेटे, जगदिश कळाम, कमलाकर कोंडावार, राजकुमार कुळसंगे आदिंनी मोलाचे सहकार्य केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय राजुरवार, पालक बुरे, विशेष अतिथी म्हणुन भोयर महाराज उपस्थित होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित विवीध स्पर्धांमध्ये राहुल बुरांडे, शंतनु सोमनकर, जान्वी राजुरवार, पल्लवी नैताम, दत्ताञय सोमनकर, भुषण टिकले, अपुर्वा घोगरे, संकेत रामटेके, रक्षाली संदोकार, किर्ती सोनुले, सक्षम बोबाटे, पवन वैरागडे, ओमदेव सोमनकर, गौरव बुरे, आनंद बोबाटे, वृषाली घोगरे, तृप्ती गाडेमोडे, कावेरी पेडपल्लीवार, तनुश्री ताटपल्लीवार, सलोनी सोमनकर, खुशाली बुरांडे, प्रज्वल रामटेके, दिया मेदाडे, दिनेश मेश्राम, सुजल शेट्टे, प्रज्वल बुरांडे, अथर्व पवार, सलोनी मोहुर्ले, पायल बुरांडे, आचल म्हशाखेञी, मोनाली जांपलवार, गायञी सरपे, सलोनी सोमनकर, स्नेहा बुरे, सानिया सरपे, आरती भोयर, वैष्णवी भोयर, छकुली भोयर, नंदकिशोर निशाणे, नागोबा मडावी, समीर शेंडे, केशर धानोरकर, आविष्का सरपे, सिद्धी जुवारे, निकीता जांपलवार, राशी बुरांडे, आदी विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्यध्यापक गणेश बोईनवार यांनी केले तर सुञसंचालन जगदीश कडाम व आभार राजकुमार कुळसंगे यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here