ग्रामपंचायत ने चक्क दारूविक्रेत्यांची यादीच केली तयार

121

– साडेआठ हजारांची दारूही केली नष्ट
The गडविश्व
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील रामगड ग्रामपंचायत समितीने लहान-मोठ्या दारूविक्रेत्यांची चक्क यादीच तयार केली असून अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अवैध दारूविक्रेत्यांवर ग्रामपंचायतची नजर राहणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत समितीने एका विक्रेत्याच्या घराची तपासणी करून ८ हजार ५०० रुपयांची दारू नष्ट केली आहे.
रामगड येथे ग्रामपंचायत समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ग्रापं समिती पुनर्गठीत करण्यात आली. ग्रामपंचायत अंतर्गत गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन नियोजन करण्यात आले. तसेच दारू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली. एक दिवसीय व्यसन उपचार शिबीर घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. यावेळी सरपंच मोरेश्वर मडावी, ग्रामसेवक अनुसया तुमलाम, ग्रापं सदस्य बौधकुमार लोणारे, प्रल्हाद नैताम, लोमेश्वर देशमुख, सैजाबाई उसेंडी, उत्तरा मेश्राम, आशा वर्कर ज्ञानेश्वरी दखने, पोलिस पाटील मंगला दखने, माधुरी बोरकर, गीता इमने, नाजूक दखने, हिराजी बन्सोड, वनिता गावळे, श्यामराव कोल्हे, केशव शेंडे, सुभाष कोल्हे आदी उपस्थित होते.
दरम्यान,एका घरी दारू विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच मुक्तीपथ व गाव संघटनेच्या सदस्यांनी एका घराची तपासणी केली असता, ८ हजार ५०० रुपये किंमतीचे १७० देशीचे टिल्लू आढळून आले. संपूर्ण माल नष्ट करून गावात पुन्हा दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, असे ठणकावून सांगण्यात आले. यावेळी तालुका संघटक मयुर राऊत व प्रेरक विनोद पांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here