गडचिरोली : बिबट्याचा चालत्या चारचाकी वाहनावर हल्ला, चालक जखमी

2173

_ वडसा- कुरखेडा मार्गावरील कसारी फाटा नजकची घटना
The गडविश्व
देसाईगंज : चालत्या चारचाकी वाहनावर बिबट्याने हल्ला चढवून वाहन चालकाला जखमी केल्याची घटना आज मंगळवार १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वडसा-कुरखेडा मार्गावरील कसारी फाटा नजीकच्या जंगल परिसरात घडली. प्रकाश बोबडे (४५) रा. नागपूर असे जखमी वाहन चालकाचे नाव आहे.प्रकाश बोबडे हे नागपूर येथून कोरची ला चारचाकी वाहनाने दैनिक वृत्तपत्राचे पार्सल वाहतूक करतात. नेहमीप्रमाणे आज मंगळवारी ते वृत्तपत्राचे पार्सल कोरची येथे सोडून नागपूर ला परत जात होते. दरम्यान कुरखेडा- वडसा मार्गावरील कसारी फाटा नजीकच्या जंगल परिसरात बिबट्याने अचानक चारचाकी वाहनाच्या समोरच्या दरवाजावर उडी घेतली यावेळी चालकाचा हात बिबट्याच्या पंजात सापडला या झटापटीत हात जखमी झाला आहे. प्रसंगावधान राखत वाहन चालकाने वाहनांवर नियंत्रण ठेवल्याने मोठी दुर्घटना होण्याचे टळले. जखमी अवस्थेत वाहन चालकाने विसोरा गाव गाठून प्राथमिक उपचार केले व त्यानंतर नागपुर येथे रवाना झाले.
कुरखेडा- वडसा मार्गावरील जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आहे. तसेच जिल्ह्यात व तालुक्यात वन्यप्राण्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र चालत्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. कुरखेडा- वडसा मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात स्थलांतर करत असतात , काही वन्यप्राणी रस्ता ओलांडत असतात त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून प्रवास करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

गडचिरोली पोलीस दलात १३६ पोलीस शिपाई पदांची भरती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here