वृत्तपत्रांवर खाद्यपदार्थ बांधुन दिल्यास आता होणार कडक कारवाई

390

– अन्न व औषध प्रशासनाने दिले कठोर कारवाईचे आदेश
The गडविश्व
मुंबई : अनेक ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधुन दिले जाते मात्र आता वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ त्वरीत बंद करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) दिले आहेत. वडापाव, पोहे, भजी इत्यादी यासारखे खाद्यपदार्थ वृत्तपत्रांमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. जनतेस सुरक्षित आणि सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा संपुर्ण देशात यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.
वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासून बनवलेली असते. केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात. वृत्तपत्रांमध्ये गरम खाद्यपदार्थ बांधुन ग्राहकांना दिले जातात. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे सर्व अन्न व्यवसायिक, हॉटल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेत्यांनी वृत्तपत्रांमध्ये अन्न पदार्थांचं पॅकिंग त्वरीत बंद करावे, अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here