– शेकडो विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्री यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी
The गडविश्व
मुंबई : कोरोनाची लाट ओसारल्यामुळे आता शाळा आणि महाविद्यालय आता सुरू होणार आहे. पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले आहे. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच आंदोलन पुकारले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवण्यात आले, आणि आता ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहे ? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.
शेकडो विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले असून जोरदार घोषणाबाजी करत आहे. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला होता.