आता प्राण्यांसाठी कोरोनाची पहिली लस तयार

98

The गडविश्व
मुंबई : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तज्ज्ञांनी माणसांसाठी लस तयार केली. त्यानंतर आता प्राण्यांना वाचवण्यासाठी लस आवश्यक असल्याचे समोर आले आहे. हाच विचार करता आता प्राण्यांसाठी देखील कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे.
हरियाणाच्या हिसारमधील केंद्रीय अश्व संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्राण्यांसाठी कोरोनाची पहिली लस तयार केलीये. आता केंद्र सरकार सिंह आणि बिबट्यांवर या लसीची चाचणी घेण्याचा विचार करत आहे . यावेळी एक चाचणी केली असता 23 श्वानांवर ही लस तपासली गेली आहे. लस दिल्याच्या 21 दिवसांनंतर सर्वांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहे.
गुजरातमधील जुनागढमध्ये असलेल्या सक्करबाग प्राणीसंग्रहालय हे सिंहांच्या प्रजननासाठी नोडल सुविधा आहे. ज्यामध्ये 70 पेक्षा जास्त सिंह आणि 50 बिबट्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या 15 जनावरांवर कोरोना लसीची चाचणी केली जाणार आहे. या प्राण्यांना 28 दिवसांच्या अंतराने लसीचा दुसरा डोस दिला जाईल. दुसऱ्या डोसनंतर, प्राण्यांवर सुमारे दोन महिने अँटीबॉडी विकसित करण्यासाठी निरीक्षण केले जाणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here