अतिदुर्गम भागातील मोकेला येथे क्लिनिक : १२ रुग्णांवर पूर्ण उपचार

159

The  गडविश्व
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा मोकेला येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे दुसऱ्यांदा व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दुर्गम भागातील मोकेला येथे एक दिवशीय व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२ रुग्णांनी नोंदणी करीत पूर्ण उपचार घेतला. गावातच उपचार मिळाल्यामुळे रुग्णांना दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना साईनाथ मोहुर्ले यांनी समुपदेशन केले. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती दिली. तसेच संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगत केस हिष्ट्री घेतली. क्लिनिकचे नियोजन तालुका प्रेरक आबिद शेख, रमेश नरोटी यांनी केले. यावेळी गाव संघटनेचे गाव पाटील रावजी येरमा, उपसरपंच बिच्चू तलांडी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here