रांगी येथील युवकांचा विद्युत विभागाला इशारा : विजेच्या लपंडावामुळे आंदोलनाची तयारी

340

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २८ : धानोरा तालुक्यातील रांगी गावातील नागरिक वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठ्यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. दररोज वादळ वा पाऊस नसतानाही लाईन बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, शिवाय बँक व्यवहार व ऑनलाइन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज २८ ऑगस्ट रोजी रांगी येथील युवक मोठ्या संख्येने धानोरा येथील महावितरण कार्यालयात धडकले. त्यांनी सहाय्यक अभियंता डोंगरे यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
निवेदनात रांगी गावासाठी निमगाव लाईनवरून तसेच वानरचुवा मार्गे बॅक फिडरद्वारे पर्यायी विद्युत पुरवठा देण्यात यावा, तसेच गावासाठी कायमस्वरूपी एक आउटसोर्स कर्मचारी मुख्यालयी ठेवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सोहेल पठाण, जावेद सय्यद, प्रेमचंद उंदिरवाडे, मनीष कुमोटी, बबलू मडावी यांच्यासह गावातील युवक उपस्थित होते.
युवकांनी इशारा दिला आहे की, “आता तरी वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडविला नाही, तर नागरिक व विद्यार्थी वर्गासह तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanora

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here