The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.२० : धानोरा तालुक्यातील मुस्का येथील शेतकरी दामोदर चैतू गावळे (वय अंदाजे ५०) हे आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आपले हरवलेले बैल शोधण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. दरम्यान अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला.
या हल्ल्यात गावळे गंभीर जखमी झाले असून तातडीने त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा सुरू केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













