The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भू येथे चोरट्या मार्गाने सुरु असलेली अवैध दारूविक्री पुन्हा थांबविण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटन, तंटामुक्त समिती, पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी गावातील विक्रेत्यांच्या घरी जाऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे.
डोंगरगाव भुसारी येथे मागील वर्षी १२ सप्टेंबर २०२३ ला सघन गाव भेट दरम्यान गावाची सभा लावून सभेमध्ये दारूबंदीचा ठराव करण्यात आला. ठरावाची अंमलबजाणी करीत गाव संघटनेने विविध कृती कार्यक्रम राबवून आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केली. यामुळे वर्षभरात दारूबंदी कायमस्वरूपी टिकून राहिली. त्यानंतर काही विक्रेत्यांनी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय पुन्हा सुरु केल्याची गुप्त माहिती गाव संघटन व तंटामुक्त समितीला मिळाली. त्यानुसार तंटामुक्त समितीने ९ सप्टेंबर २०२४ ला बैठक घेऊन दारूबंदी कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने तंटामुक्त समितीतील सर्व सदस्य, गाव संघटनेचे सदस्य व मुक्तीपथ तालुका टीम यांनी संयुक्तरित्या दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू विक्री केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली. या मोहिमेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डंबाजी सामृतवार, गावचे सरपंच छायाताई खरकाटे, पोलीस पाटील वंदना राऊत, तालुका समिती सदस्य दौलत धोटे, तंटामुक्त समितीचे सदस्य सुधीर ठाकरे, नानाजी राऊत, संघटनेचे सदस्य मंजुषा कुथे, पंढरी ढोरे, रेवनाथ ढोरे, आरमोरी पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार हंसराज धस, मुक्तिपथचे तालुका संघटक विनोद कोहपरे, तालुका उपसंघटक मनीषा प्रधान, स्वीटी आकरे उपस्थित होत्या.

(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #surjagad #muktipath #gadchirioli )