गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
४४ वर्षांचा गडचिरोलीचा प्रवास; विकासाच्या नव्या क्षितिजाकडे वाटचाल!
गडचिरोली | विशेष : निसर्गसंपन्नता, आदिवासी संस्कृती आणि समृद्ध जैवविविधतेची ओळख असलेल्या गडचिरोलीने ४४ वर्षांत विकासाची नवी दिशा पकडली आहे.
औद्योगिक विकास, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, रोजगार आणि पायाभूत सुविधांसोबतच पर्यावरण संवर्धनावर भर देत गडचिरोली आता नव्या संधींकडे वाटचाल करत आहे.
ग्रीन मायनिंग, वृक्षलागवड, आधुनिक शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा सुविधा आणि स्थानिक रोजगारनिर्मितीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे. त्याचवेळी आदिवासी संस्कृती आणि निसर्गाचे जतन करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
निसर्गाची साथ, संस्कृतीची मुळे आणि विकासाची नवी वाट — हाच गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग!









