केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून ग्रामस्थांनी उन्नती साधावी : आमदार कृष्णा गजबे

151

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. १४ : मोदी सरकार व राज्य सरकार च्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन ग्रामस्थांनी सर्वांगीण उन्नती साधावी असे आवाहन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ग्रामपंचायत बांधगाव येथे ०९ डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सरपंच किशोर राणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुरखेडाचे तहसीलदार राजकुमारजी धनबाते, तालुका कृषि अधिकारी संजय रामटेके, मारेकरी, MSRLM, राऊत, नोडल अधिकारी तर प्रमुख अतिथी भाजपा तालकाध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, उल्हास देशमुख, लालाजी वटी उपसरपंच, ग्रा. पं.चे सर्व सदस्य गण, रुषी राणे, पो.पा, काशिनाथ वाढई, तंटामुक्ती अध्यक्ष, जयवंत कापकर, प्र तिष्ठित नागरिक तसेच महिला बचत गट च्या सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावून जनकल्याणकारी योजनेचा लाभ मिळावा याकरिता जनजागृती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here