गिरोला येथे ग्रामबाल संरक्षण समिती स्थापन

173

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० ऑगस्ट : स्पर्श गडचिरोली व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन च्या वतीने एक्सेस टू जस्टीस या प्रकल्पा अंतर्गत धानोरा तालुक्यातील गिरोला ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा ठरवून ग्राम बालसंरक्षण समितीची स्थापन करून बालविवाह विरुद्ध शपथविधी राबविण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपसरपंच रुपेश तुलावी होते. समिती स्थापना पूर्वी बालकांच्या विविध समस्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करणे व तिला सक्रिय बनवणे गरजेचे आहे असे प्रमुख मार्गदर्शक वैभव सोनटक्के क्षेत्र अधिकारी स्पर्श यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेविक सौ.जांभुळकर तसेच ग्रामसदस्य, नागरिक उपस्थित होते.
बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी रुपेश तुलावी, सचिव आरती मेश्राम, तर सदस्य पदी शालूताई गेडाम, रवींद्र गोटा, भारती सयाम, शर्मिला सयाम, मंदाताई दर्रो, तुलसी कोवे, सुमित गेडाम, आरती मेश्राम, विलास मडावी आदींची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here