The गडविश्व
मुंबई, २६ नोव्हेंबर : माहेरची साडी ते नटसम्राट अशा अनेक गाजलेल्या मराठी व हिंदी सिनेमांमधून मनोरंजन विश्वाला समृद्ध केलेले चतुरस्त्र जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले.मृत्यूसमयी ते ७७ वर्षाचे होते.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. त्यांचे माहेरची साडी हा चित्रपट त्या काळात अधिक फेम होता तसेच नाना पाटेकर यांच्यासह नटसम्राट या मराठी चित्रपटात सुद्धा त्यांची मोलाची भूमिका होती.
विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या मृत्यूने सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

#TheGadvishva #vikramgokhale #vikram Gokhale #maherchi sadi fem #natsamrat #nana patekarh
आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन. @DDNewsHindi @ddnewshindi#vikramgokhale #विक्रम_गोखले pic.twitter.com/lsScMeBMiP
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) November 26, 2022
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/invM7tyBTn
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 26, 2022