देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही : ना. सुधीर मुनगंटीवार

198

– मंदसौर येथील विशाल जाहीर सभेत प्रतिपादन
The गडविश्व
मंदसौर (मध्य प्रदेश), १९ जून : “सत्तेसाठी प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देवून जातीधर्मात भेद निर्माण करणाऱ्याला कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल; प्रत्येक हाताला काम, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम, पायाभूत सुविधांसह गरीब-कल्याणकारी योजना वेगवान ही कार्यपद्धती अवलंबून भारताला नऊ वर्षात जागतिक स्तरावर सन्मान प्राप्त करुन देणाऱ्या कर्तुत्वान विश्वगौरव, युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अधिक ऊंची प्राप्त करुन देण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रत्येकाने पुढे यायाला हवे” असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यपालन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले. “मोदी@9” अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित विशाल जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर खासदार सुधीर गुप्ता, मध्य प्रदेश चे अर्थमंत्री जगदीश गौडा, एमएसएमई मंत्री ओमप्रकाश सकलेचा, कॅबिनेट मंत्री हरदीपसिंह डांग, आमदार यशपाल सिसोदिया, आमदार डॉ राजेंद्र पांडे, आमदार माधव मारू, आमदार दिलीपसिंह परमार, आमदार देवीलाल धाकड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या गत नऊ वर्षांतील कल्याणकारी योजनांचा आढावा घेताना नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व योजना आणि संकल्पना आणून देशाला कीर्ती आणि गरिबांना सन्मान प्राप्त करुन दिला. कॉंग्रेसकडून मात्र केवळ घोषणा आणि खोट्या प्रचाराच्या आधारावर समाजात आणि धर्मात तेढ निर्माण केल्याचे प्रतिपादन केले. नरेंद्र मोदी यांनी आतंकवादमुक्त, रोजगारयुक्त, भयमुक्त, नक्षलमुक्त, विकासयुक्त भारताचा निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सर्वच आघाड्यांवर पुढाकार घेतला आहे . जगातील मोठमोठ्या राष्ट्रांचे प्रमुख आज आदराने नरेंद्र मोदी यांची सन्मानाने वाट बघतात ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत, उज्वला गॅस, नारी सन्मान यांसारख्या कितीतरी योजना गरिबांसाठी आणून क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. पायाभूत सुविधांसह रस्ते सुधार, औद्योगिक प्रगती, शिक्षण, आरोग्य सुविधामध्ये भारत आज भक्कमपणे उभा आहे ; असे प्रतिपादन करुन विकासाचा हा झंजावात असाच कायम रहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या असे आवाहन केले .
(the gdv, the gadvishva, sudhir mungantiwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here